जगभरातील मराठी साहित्यावर प्रेम करणाऱ्या वाचकांना ग्रंथसंपदा उपलब्ध करून देण्यासाठी कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांची *ग्रंथ तुमच्या दारी* ही वाचकप्रिय योजना गेली *15 वर्ष* विस्तारत आहे *ग्रंथ तुमच्या दारी* मराठी वाचक जेथे , ग्रंथ तुमच्या दारी तेथे . ग्रंथ तुमच्या दारी ची विक्रमी घोडदौड . . . *4 कोटी रुपयांची ग्रंथसंपदा* ● 2000 ग्रंथ पेट्या ● 1 लाख पुस्तके ● 35 हजार वाचक ● 6500 लेखक समाविष्ट ● 900 प्रकाशक समाविष्ट ● भारताबाहेर 18 देशात ● नागरीवस्त्या , हॉस्पिटल , आधाराश्रम , पोलीस स्टेशन , कारखाने , आदिवासी पाडे , कारागृह अशा अनेक ठिकाणी उपलब्ध आहे . महाराष्ट्र , गोवा , गुजराथ , दिल्ली , सिल्व्हास, तामिळनाडू , कर्नाटक तसेच *भारताबाहेर* ● यु ए ई - दुबई ● जुबेल ● सॅनफ्रान्सिस्को ● ऑस्ट्रेलिया - मेलबर्न , ब्रिस्बेन ● कॅनडा - टोरंटो , एडमंटन ● टेक्सास - ह्युस्टन , डॅलस ● स्वित्झर्लंड - झुरीक ● अटलांटा ● मिनिसोटा ● वॉशिंग्टन डी सी ● लंडन ● नेदरलँड ● तोक्यो ● नॉर्वे ● ओमान - सोहार , मस्कत ● सिंगापूर ● मॉरिशस ● फिनलँड ● श्रीलंका ग्रंथ तुमच्या दारी *बाल विभाग* विश्वास ज्ञानप्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट या संस्थेच्या माध्यमातून आदिवासी भागातील शाळा तसेच शहरातील गरीब विद्यार्थ्यां असलेल्या शाळांना मुलांना ज्ञान , विज्ञान आणि मनोरंजन या अनुषंगाने असलेली मराठी आणि इंग्रजी भाषेतील दर्जेदार पुस्तकांच्या शंभराहून अधिक फिरत्या ग्रंथ पेट्या विनामूल्य वाचनासाठी उपलब्ध आहेत ग्रंथ तुमच्या दारी *बोलक्या पुस्तकांच्या ग्रंथ पेट्या* मोडक सेंटर , नॅब महाराष्ट्र या संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील दृष्टीबाधित (अंध) मुलांच्या शाळांमध्ये ऑडिओ पुस्तकांच्या पेट्या ऐकण्यासाठी उपलब्ध होत आहेत ग्रंथ तुमच्या दारी ( हिंदी ) *ग्रंथ तुम्हारे द्वार* विश्वास ज्ञानप्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट या संस्थेच्या माध्यमातून दर्जेदार हिंदी साहित्य वाचनासाठी उपलब्ध करून देण्यासाठी यु. ए. ई. येथे ग्रंथ तुम्हारे द्वार योजना कार्यान्वित करण्यात आली आहे *विनायक रानडे* ◆ ग्रंथ तुमच्या दारी (मराठी) ◆ ग्रंथ तुम्हारे द्वार (हिंदी) ◆ माय Book Basket ◆ निसर्गायन ◆ सूर विश्वास ◆ विश्वास ग्रुप *फक्त बोलण्यासाठी* +91 9922225777 फक्त व्हाट्सएपसाठी +91 9423972394 *मोलाची साथ* वाढदिवस , एकसष्ठी , पंच्याहत्तरी , सहस्त्र चंद्र दर्शन तसेच दिवंगत आप्तेष्टांच्या स्मरणार्थ अशा अनेक प्रसंगानुरूप मिळालेल्या भारतात ८० जी अंतर्गत आयकरात सूट असलेल्या देणग्यांमुळे असंख्य मराठी वाचकांना त्यांच्या निवासी भागात , कार्यालयात , दवाखान्यात अशा त्यांच्या जवळपासच्या भागात वाचनासाठी विनामोबदला विनासायास उपलब्ध होत आहेत . जगभरात आज मराठी माणूस नाही अशी भूमी नाही म्हणजेच ग्रंथ तुमच्या दारी योजनेच्या भरारीला आता आकाशाला गवसणी घालण्यास कोणतीच बंधने नाहीत, जिथे म्हणून मराठी शब्द ,मराठी भाषा आहे ,मराठी माणूस आहे तिथे तिथे आमची योजना जावी अशी आमची इछा आहे. ग्रंथ तुमच्या दारी योजनेतील सहभागी सर्व वाचक , समन्वयक , संस्था , देणगीदार , हितचिंतक यांच्या सक्रिय सहभागानेच हा विस्तार होत आहे , सर्वांचे आभार Please contact - *Vinayak Ranade* Mob - +91 99 22 22 5777 Only What'sup - + 91 9423972394 Facebook - https://www.facebook.com/vinayak.ranade.7 Blog - http://granthtumchyadari.blogspot.in/