Description

Warning, this event was expired!

*ग्रंथ तुमच्या दारी* लवकरच अमेरिकेतील *साऊथ फ्लॉरिडा* (ज्युपिटर, पोर्ट सेंट लूसी, पाम बीच गार्डन्स, सिंगर आयलंड, नॉर्थ पाम बीच , वेस्ट पाम बीच , लोक्साहाची, एकरेज, वेलिंग्टन, रॉयल पाम बीच , पाम स्प्रिंग्स , ग्लेड्स, बॉयन्टन बीच, बोका रॅटोन, पेम्बरोक पाइंन्स आणि मायामी पर्यन्त ) परिसरात! मराठी दर्जेदार साहित्य वाचनासाठी उपलब्ध करून देणारी कुसुमाग्रज प्रतिष्ठान ची ग्रंथ तुमच्या दारी वाचकप्रिय योजना *साऊथ फ्लॉरिडा* येथे सुरू करण्याचा मानस आहे. *साऊथ फ्लॉरिडा* आणि जवळपासच्या सर्व गाव/शहरातील मराठी साहित्यप्रेमी वाचकांनी संपर्क साधावा *श्री. राजेश कोप्पीकर* +1 561 460 6303 समन्वयक , ग्रंथ तुमच्या दारी , साऊथ फ्लॉरिडा, FL, USA *विनायक रानडे* ग्रंथ तुमच्या दारी कुसुमाग्रज प्रतिष्ठान Mobile +91 9922225777 Whatsapp only +91 9423972394 Facebook – https://www.facebook.com/vinayak.ranade.7 जगभरातील मराठी साहित्यावर प्रेम करणाऱ्या वाचकांना ग्रंथसंपदा उपलब्ध करून देण्यासाठी कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांची ग्रंथ तुमच्या दारी ही वाचकप्रिय योजना गेली 16 वर्ष विस्तारत आहे ग्रंथ तुमच्या दारी मराठी वाचक जेथे , ग्रंथ तुमच्या दारी तेथे . ग्रंथ तुमच्या दारी ची विक्रमी घोडदौड . . . 4 कोटी रुपयांची ग्रंथसंपदा ● 2000 ग्रंथ पेट्या ● 1 लाख पुस्तके ● 35 हजार वाचक ● 6500 लेखक समाविष्ट ● 900 प्रकाशक समाविष्ट ● भारताबाहेर 15 देशात ● नागरीवस्त्या , हॉस्पिटल , आधाराश्रम , पोलीस स्टेशन , कारखाने , आदिवासी पाडे , कारागृह अशा अनेक ठिकाणी उपलब्ध आहे . महाराष्ट्र , गोवा , गुजराथ , दिल्ली , सिल्व्हास, तामिळनाडू , कर्नाटक तसेच भारताबाहेर ● यु ए ई – दुबई ● ऑस्ट्रेलिया – मेलबर्न , ब्रिस्बेन ● कॅनडा – टोरंटो , एडमंटन ● अमेरिका – कॅलिफोर्निया – सॅनफ्रान्सिस्को टेक्सास – ह्युस्टन , डल्लास ऍरिझोना – फिनिक्स जॉर्जिया – अटलांटा पेनेसेल्व्हेनिया – फिलाडेल्फिया मिनिसोटा वॉशिंग्टन डी सी ● स्वित्झर्लंड – झुरीक ● लंडन ● नेदरलँड ● जपान – टोकियो ● नॉर्वे ● ओमान – सोहार , मस्कत ● सिंगापूर ● मॉरिशस ● फिनलँड ● श्रीलंका भारताबाहेरील आमच्या मराठी वाचक बांधवांसाठी . . . . ग्रंथ तुमच्या दारी संकल्पनेचे स्वरूप थोडक्यात असे असेल . . . . . दर्जेदार विविध विषयांची , लेखकांची २५ पुस्तकांची एक पेटी असेल, ज्यामध्ये उत्तमोत्तम ,निवडक मराठी अथवा इतर भाषांतील साहित्याचा मराठीत अनुवाद असलेली पुस्तके असतील . सहित्याचे ,लेखनशैलीचे जास्तीत जास्त नमुने जसे कथा , कादंबरी , विनोदी , रहस्य , चरित्र , प्रवासवर्णन . . . . . . थोडक्यात सर्व समावेशक ग्रंथ संपदा देण्याचा आमचा आटोकाट प्रयत्न असेल. ग्रंथ संपदा वाचनासाठी मासिक किंवा वार्षिक वर्गणी नसेल. सहभागी होण्यासाठी फक्त एकदाच देणगी मूल्य आवश्यक आहे एका वाचक कुटुंबाकडे सदर ग्रंथ पेटी 3 महिन्यांच्या कालावधी साठी असेल . योजना सुरु करताना किमान ८ ग्रंथ पेट्या विविध भागातील वाचकांसाठी उपलब्ध व्हाव्यात . प्रत्येक ग्रंथ पेटीतील पुस्तके वेगवेगळी असतील . कुसुमाग्रज प्रतिष्ठान च्या निवड समिती मार्फत प्रत्येक पेटीत वैविध्यपूर्ण तसेच कोणतेही पुस्तक दुसऱ्या पेटीत सारखे होणार नाही याची दक्षता घेतली जाते . दर 3 महिन्यांनी वाचक कुटुंबाची ग्रंथ पेटी इतर वाचक कुटुंबासोबत बदलली जाते . योजनेच्या उपयुक्तता तसेच नाविन्यामुळे वाचकांच्या सक्रिय सहभागाने विस्तार सुरु राहतो . कालांतराने नवीन वाचक जोडत गेल्याने ग्रंथ पेट्या वाढत जातात , असा विस्तार होत असतांना योजनेतील प्रत्येक वाचकाला अविरत वैविध्यपूर्ण वाचनाचा आनंद घेता येतो . जगभरात आज मराठी माणूस नाही अशी भूमी नाही म्हणजेच ग्रंथ तुमच्या दारी योजनेच्या भरारीला आता आकाशाला गवसणी घालण्यास कोणतीच बंधने नाहीत, जिथे म्हणून मराठी शब्द ,मराठी भाषा आहे ,मराठी माणूस आहे तिथे तिथे आमची योजना जावी अशी आमची इछा आहे. एका छोट्याशा कल्पनेला आज जो प्रचंड प्रीतिसाद मिळत आहे तो उतरोतर वाढावी हीच आमची संकल्पना आहे. मोलाची साथ वाढदिवस , एकसष्ठी , पंच्याहत्तरी , सहस्त्र चंद्र दर्शन तसेच दिवंगत आप्तेष्टांच्या स्मरणार्थ अशा अनेक प्रसंगानुरूप मिळालेल्या भारतात ८० जी अंतर्गत आयकरात सूट असलेल्या देणग्यांमुळे असंख्य मराठी वाचकांना त्यांच्या निवासी भागात , कार्यालयात , दवाखान्यात अशा त्यांच्या जवळपासच्या भागात वाचनासाठी विनामोबदला विनासायास उपलब्ध होत आहेत . ग्रंथ तुमच्या दारी योजनेतील सहभागी सर्व वाचक , समन्वयक , संस्था , देणगीदार , हितचिंतक यांच्या सक्रिय सहभागानेच हा विस्तार होत आहे , सर्वांचे आभार *कृपया* अमेरिकेतील *साऊथ फ्लॉरिडा* येथील आपल्या परिचितांना *हा मेसेज फॉरवर्ड करावा*